Ad will apear here
Next
विसाव्याचे क्षण
"थकलो बुवा आज, आज ऑफीसमध्ये काम करायचा कंटाळा येत होता, खुप झोप येत होती, आताशा नको वाटत हे सगळं,"आजकाल पन्नाशीत आलेल्या लोकांचे हे वाक्य आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात, खरच ही बाब विचार करायला लावणारी आहे. अडीच अक्षराचा जन्म आणि अडीच अक्षराचा मृत्यु ह्या दोन शब्दांच्या गर्तेतच मनुष्य फिरत असतो. खर तर खुप भाग्यवान लोकांना मनुष्य जन्म प्राप्त होतो पण त्याला जगायच कस हा त्याचा वैयक्तिक विचार असतो. तो कसा सार्थकी लावायचा हे ज्याच त्याने ठरवायचं असत.मनुष्य जन्माला येत नाही तोच त्याच्यावर आईबापाचे अपेक्षांचे ओझे, संस्कारांचे लेपन, घराण्याची प्रतिष्ठा इ.गोष्टींचे पुट चढवली जातात.प्रत्येकच मायबापाला आपला मुलगा, मुलगी मोठ्या पदावरचा अधिकारी व्हावा, त्याच्यापाशी गाडी, बंगला,भरमसाठ पैसा असावा अस वाटत, मग याची पुर्तता करण्यासाठी सुरु होते एक जीवघेणी शर्यत जिचा कुठेही अंत नसतो.मला या बाबतीत " थ्री इडीयट्स " हा सिनेमा खुपच आवडतो, त्यातला विरु सहस्त्रबुध्धे आपल्या टोनमधे जे एक वाक्य म्हणतो न "life is a race" ते अगदी आजच्या परीस्थितीला तंतोतंत लागु पडतं ही नुसती liferace नाही तर ही ratrace आहे. आजकाल आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता जो तो नुसता धावत असतो.पैसा, त्याच्यामागे येणारे ऐश्वर्य, सुखासीनता कोणाला नको असते? पण त्याला काळाच्या,वयाच्या आणि वेळेच्या मर्यादा हव्याच ना? उर फुटेतोवर धावायच आणि सुख हातात येईल अस वाटताच शरीराने साथ सोडावी हे काही केल्या digest च होत नाही. साधारण वयाच्या 15 व्या वर्षापासून सुरु झालेल्या ह्या शर्यतीत वयाची पन्नाशी कधी येते ते कळतच नाही, आजकाल तर तसेही अकाली वय वाढल्यासारखे वाटते,स्वप्नांची पुर्तता करतांना माणसाची दमछाक होते पण हव्यास काही सुटत नाही.प्रत्येकाला मोठ्या अधिकाराची नौकरी,मोठा फ्लॅट किंवा बंगला, महागडी फोर व्हीलर सगळच हव असत, मग त्या स्टेटसला साजेस lifestyle नको का? ते maintain करण्यात व बॅन्केचे हफ्ते भरण्यात अख्ख आयुष्य जात, पन्नाशीपर्यंत या ओझ्याने शरीर मात्र थकुन गेलेल असत, खर तर भरभरुन जगायच्या दिवसात खांद्यावर अपेक्षांचे ओझे घेऊन जो तो धावत सुटतो आणि जेव्हा खरच या गोष्टीचा आनंद घ्यायची वेळ येते तेव्हा सांधेदुखी, हार्ट प्राॅब्लेम, डायबेटीज, असे मोठे मोठे रोग शरीर पोखरुन काढतात.अशा वेळेस तो पैसा काय कामाचा? आपण हा पैसा सुखासाठी मिळवलेला असतो तो दवाखान्याची बिल भरतांना वापरावा लागतो याच वाईट वाटत.याच्याकरता आयुष्यभर आपण मरमर करत असतो का? जगण्याच्या आपाधापी मधे विसाव्याचे क्षण तर हवेच ना, नाहीतर आयुष्याच्या उतरणीवर धाप लागेलच हे लक्षात घ्यायला हव. आपल्या गरजा जर थोड्या कमी केल्या तर हे विसाव्याचे क्षण आपण निश्चितच चांगल्या प्रकारे उपभोगु शकतो. सुसंस्कृत जीवन जगण्याकरता संस्कार महत्वाचे असतात पण त्याचाही अतिरेक नको.पैसा हा तुम्हाला कधी आणि कोणाशी वैर घ्यायला लावेल ते सांगता येत नाही अशा वेळेस संयम राखण्याकरता संस्कार महत्वाचे ठरतात. मग सवाल उरतो की जास्त पैसा कमवायचाच नाही का? तस नाही जास्त पैसा कमावण काही वाईट नाही पण त्याचा विनियोग मात्र व्यवस्थीत केला गेला पाहीजे. कमवलेल्या धनाचा आनंद घेता आला पाहीजे.निरर्थक गोष्टींवर वेळ आणि पैसा वाया घालवण्यात काहीच शहाणपणा नाही.दुसरी बाब म्हणजे समाधानी वृत्ती,मनाने समाधानी असलं तर आपल्या नकळत अपेक्षापेक्षा जास्त मिळतं. या बाबतीत काही वेळा युरोपियन लोकांचे जीवन अनुकरणीय आहे.डोक्यावर छप्पर असावे म्हणुन एक घर, त्या घरात आवश्यक तेव्हढीच भांडी, जास्तीत जास्त काम स्वतःची स्वतःच करायची,आवश्यक तितकाच पैसा बॅन्केत ठेवायचा व एका सॅकमधे गरजेपुरता सामान घेऊन स्वच्छंदपणे जगभ्रमंती करायची, जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा.आता आपल्याकडे पण अशा प्रकारे जगणारे लोक असतीलच की, पण आपण सगळया गोष्टी भावनिक, कौटुंबिक पातळीवर करतो आणि त्यातुन जर काही बखेडे उभे राहीले तर आयुष्यभर पस्तावतो.आता प्रत्येकच नाण्याला दोन बाजु असतात. या गोष्टींचे जसे तोटे असतात तसे फायदेपण असतात, आपल्याकडे जसे नात्यांमधे ओलावा असतो.माया, ममता असत तस युरोपियन लोकांच्या फॅमिलीत या गोष्टीचा अभाव असतो.नात्यांमधे कोरडेपणा असतो. त्या कारणानेही असेल कदाचित ते लोक आपले विसाव्याचे क्षण बाहेर शोधत असतील.माझ्याकडे एका युथ ऑर्गनायझेशन कडुन युथ एक्सचेंज मधे एक जापनीज मुलगा (28 वर्षांचा) दोन महिने रहायला आला होता.युकीत्सुगी कोमाझावा अस त्याच नाव होत. तो माझ्या घरी आला तेव्हा सुरुवातीचे काही दिवस त्याला आणि आम्हाला जरा adjust करायला जड गेले, पण सात आठ दिवसात तो रुळला, त्याला आमचे फॅमिलीचे एकत्र जेवण करणे, जेवणासाठी एक दुसरयाची वाट पाहणे, जेवतांना हास्यविनोद करत जेवणे, एकत्रित साजरे केले जाणारे गणपती, पोळ्या सारखे उत्सव,मित्र मैत्रिणींना जमवुन पार्टी करणे,एखाद्या वेळेस रात्री जागुन केलेल्या गप्पा, गाणी हे पाहुन नवल वाटायचे." You, Indians are crazy peoples" अस म्हणायचा, थोडक्यात आपण खुपच मोकळे ढाकळे लोक आहोत अस त्याच काहीस मत होत.तो मात्र अगदी याविरुद्ध होता, breakfast झाला की आपली ताटली आपणच साफ करणार,त्याच कोणतही काम केल की चार वेळा वाकुन thank you म्हणणार ,अगदी कामवाल्या बाईलासुद्धा thank you म्हणणार.आपल्यासारखा बत्तीशी दाखवत मनमुराद हसणार नाही तर तोंडावर हात ठेऊन आवाज न करता हसेल, सगळंच robotic.परंतु त्याला आपल्याकडील वातावरण खुप आवडल, तो भारतीय कुटुंबातील एकमेकांच्या नात्यातील जिव्हाळ्याचे संबंध, आई, वडील, मुलांमधील एकमेकांप्रतीची आसक्ती, प्रेम पाहुन भारावुन गेला, त्याला कारणही तसच होत, हा मुलगा गेल्या दहा वर्षांपासुन घरापासुन लांब फिरतो आहे, पण आई वडीलांना तो कुठे आहे हे माहीत नव्हत .त्याची एक लहान बहीण आहे ती काय करते हे याला माहीत नाही, तो सांगत होता की तो घरी असला काय किंवा नसला काय तिकडे काहीच फरक पडत नाही.त्याची आई आपल्यासारखी सतत त्याला फोन करुन भंडावुनही सोडत नाही,की तो घरी जात नाही म्हणुन काळजीही करत नाही,पण मला हे जरा पचायला जड गेल, आपण भारतीय आई वडिल अस वागुच शकत नाही,इथे संस्काराचे महत्व पटते.आपल्याकडे आजही बाप नावाचा माणुस मुलगा कितीही मोठा होऊ दे त्याच्या पाठीवर हात ठेऊन त्याला प्रसंगाला "मी आहे ना," असा आश्वासनात्मक धीर देतो तेव्हा खरच खुप बर वाटत.तुला झेपेल एव्हढच काम कर अस म्हणतो तेव्हा त्यातुन मुलाबाळांची काळजी दिसते.हे असे विसाव्याचे क्षण या अशा लोकांच्या कीती बर वाटणीला येत असतील? या युकीत्सुगीला या वर्षी जापानमधे government job लागला तोही तीन करोडचे पॅकेज असलेला, आपण तर इतक्या मोठ्या ऑफरची नोकरी पाहुन वेडेच झालो असतो पण हा मुलगा म्हणतो की मला हे पॅकेज कमी वाटत आहे, मान्य आहे जापानच्या lifestyle नुसार ते कमी पडत असतील.पण खरोखरच ते इतके कमी असतील का? आता याची धडपड जास्त पॅकेज असलेल्या जाॅबसाठी सुरु आहे, त्याला या वयात मागील वर्षी stress मुळे heart problemलाही सामोरे जावे लागले, मनोमन तो खुप घाबरला होता पण तरीही त्याची मोठ्या पॅकेजची जिद्द मात्र कायम आहे.पण शरीराने warning दिलि त्याच काय?आपल्याकडेही आता असेच प्रकार व्हायला लागलेत पण त्यामानाने awareness फारच कमी आहे. भौतिक सुखाच्या मागे लागुन मनुष्य खरया सुखाला वंचित होत चालला आहे.मानसिक ताणतणाव, शारीरीक कष्ट,कुवतीबाहेर जाऊन अपेक्षांची पुर्ती करण यामधे विसाव्याचे क्षण मानवाच्या हातातुन सुटत चालले आहे. थोड्या आपण आपल्या गरजा कमी केल्या तर विसाव्याचे बहुमुल्य क्षण आपण नक्कीच अनुभवु शकु ज्याची आपल्याला नितांत गरज आहे.थोड भुतकाळात डोकावुन बघीतले तर त्या वेळचे लोक कीती सुखी होते ते आपल्या लक्षात येईल.प्रत्येक गोष्टीत बडेजावपणा नसायचा तर जिव्हाळा असायचा.आजच्यासारखी जीवघेणी चढाओढ नव्हती. पैसा कमीजास्त असायचा पण कौटुंबिक सुख,समधान भरपूर होत.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होता.त्यामुळे माणसाचे आयुष्यमान पण खुप होते.चिंता, तणाव जास्त नसल्यामुळे आयुष्यात निवांतपणा होता.गरजा कमी व समाधान जास्त असल्यामुळे विसाव्याचे क्षण गाठीला बांधुन मनुष्य जीवनाचा मनमुराद आनंद घेत होता.सध्याचे जीवनमान पाहता मनमुराद व भरभरुन जगण्यासाठी एकदा परत विसाव्याचे क्षण आपल्या गाठीशी बांधणे गरजेचे झाले आहे, नव्हे ती आता काळाची गरज बनत चाललेली आहे.दवाखान्याची पायरी चढण्यापुर्वी व डाॅक्टरांनी विश्रांती घ्या असे सांगण्यापुर्वी आपणच स्वतःहुन विसाव्याचे क्षण आपल्या स्वतःकरता मिळवणे आवश्यक आहे. इति शुभं भवतु.🙏🏻🙏🏻
 सौ.माधवी जोशी माहुलकर. 
(माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही. )🙏🏻🙏🏻
 #marathi #marathimovies #marathiatricle #marathisongs #oldhindisong #marathibooks #marathibook #marathiwriter #writers #write #writer
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WVTXCT
Similar Posts
अगतिक मातृत्व. *अगतिक मातृत्व*. दुपारचा दिड वाजत आला होता,आज सुमनला सकाळची धुण भांड्यांची काम आटोपुन घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तीला परत सिन्हा बाईंकडे कीटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तीला सध्या काळजी लागली होती ती घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दिपकची.
वर्तुळ. वर्तुळ. 🎯🎯🎯🎯वर्तुळ लिहीतांना सुद्धा शब्द गोलाकारच जास्त येतात. आकारच तसा आहे याचा.गोल, गरगरीत, वाटोळा, चक्राकार, गोलाकार, गोलाई, गोलार्ध अशी अनेक विशेषणे जरी या शब्दाला असली तरी अर्थ मात्र एकच निघतो.
गजरा "सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही आहे रे.." नानांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतुन बाहेर आला,तसे नानांनी त्याला जवळ घेऊन आई घरात कुठेच दिसत नसल्याचे सांगितले.
मनाचिये गुंती. " मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला,मोगरा फुलला, मोगरा फुलला." मला ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी नेहमीच भुरळ पाडतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language